पुन्हा पाऊस नवीन हवामान अंदाज आला

शेतकरी बांधवानो आपणास आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले हवामानतज्ञ श्रीमान किरणकूमार जोहारे यांनी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात एकूण पाच चक्री.वादळे भारतीय किणारपट्टी वर धडकणार आसे सांगितले. हे महत्त्वाचे आहे.

पण माझ्या मतानुसार यांचा अंदाज खोटा ठरवावा,कारण भारतीय शेती आणि शेतकरी वाचेल. व शेतकऱ्यांचा फायदा होईल.

माझा माहितीनूसार तसे होतांना दिसत आहे.कारण येणाऱ्या पंचवीस डिसेंबर पर्यंत एकही चक्रीवादळ येणार नाही. हे मी ठामपणे सांगू इच्छितो.।

कारण आज दहा डिसेंबर चालू आहे. आणि या काळात फक्त एकच चक्रीवादळ आले आहे. आणि त्यांचा परिणाम मराठवाड्यात, विदर्भात होईल असे सांगितले होते. पण तसे झाले नाही. हे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांनी कोकण,मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे जास्त प्रमाणात राहणार नाही,असे सांगितले होते पण नेमके तेच झाले.एक,दो,तीन,डि.याच भागात पाऊस जास्त झाला आहे. हे विचारात घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो भारतीय किणारपट्टी वर एकूण आँकटोबर ते डिसेंबर महिन्यात पाच चक्रीवादळे येतात. ते डिसेंबर ते जानेवारी येत नाहीत हे महत्त्वाचे आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक चक्रीवादळ आले.पण बाकीच्या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात झाले नाही हेही चांगले झाले. आणि मराठवाडा व विदर्भात या वादळाचा थेट परिणाम होईल हे पण त्यांनी सांगितले होते. पण तसे न होता जवाद वादळाचा ईशान्य भारतावर परिणाम झाला. याचा कुठलाही परिणाम मराठवाडा, विदर्भ यावर झाला नाही.
आणि त्याच्या म्हणण्यानूसार चार वादळ बाकी आहेत.
याचा नेमका परिणाम कसा होईल याचे आपण सर्व साक्षीदार राहु हे निश्चित.
वरीलप्रमाणे त्यांचे अंदाज शेतकऱ्यांसाठी खोटे ठरोत हि महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या मालकास विनंती.
राजाभाऊ उगले.
हवामानतज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *