मिळणार साड्या | Angnvadi New GR December 2021

प्रस्तावना
पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ संच हातमाग साड्या उपलब्ध करुन देण्यासंदर्गात केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक-१ येथील पत्रान्चये सूचित करुन त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यानुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना. नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक-२ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना साड्या घेण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक-३ येथील शासन निर्णयामधील तरतुदीनुसार प्रति साडी रु.४००/- प्रमाणे २ साड्यांकरिता रु.८००/- एवढ़ी
रक्कम प्रत्येक अंगणवाडी कर्मचा-यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभार्थी हस्तांतरित (DBT) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही बातमी वाचा पाणी शोधण्याची पद्धत आता मोबाईल वर पहा

शासन निर्णय :-
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ नग हातमाग साड्या घेण्याकरिता प्रति साडी रु.४००/- प्रमाणे एकुण रु.८००/- एवढी रक्कम संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक अंगणवाडी कर्मचा-यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभार्थी हस्तांतरित (DBT) करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा वर्क फ्रॉम होम जॉब

२. त्यानुषंगाने याप्रकरणी केंद्र शासनाचे संदर्भाधीन क्र. १ येथील पत्र तसेच संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयामधील तरतुदींचे पालन करण्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई
यांनी दक्षता घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *