Covid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान ? GR पहा

ज्ञापन :- अधिदान व लेखाधिकारी, मुंबई यांना असे कळविण्याचे मला निदेश आहेत की, वर नमूद दिनांक २६.११.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास रू.५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य प्रदान करणे या योजनेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा कडून मंजूर करण्यात येणाऱ्या २०,००० अर्जदारांना रू.५०,०००/- प्रत्येकी याप्रमाणे एकूण रु. १०० कोटी रुपये शंभर कोटी फक्त) इतकी रक्कम मंजूर करण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे

०२. वर नमूद शासन परिपत्रक दिनांक ०८.१२.२०२१ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अधिदान व लेखाधिकारी कार्यालयास रु. १०० कोटी इतक्या रकमेचे देयक सादर करण्याची कार्यवाही तातडीने
करण्यात यावी.

3. देयक मंजूर झाल्यानंतर देयकाची रक्कम ईसीएसव्दारे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उघडण्यात आलेल्या खालील तपशीलाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी.
IFSC Code KKEK0000६४७ बँकेचे नाव
शाखा खातेदाराचे नाय खाते क्र कोटक महिंद्रा खेतान भवन, १९८, सचिव, आपत्ती ९५४५४६२८५४ जमशेदजी टाटा रोड, | व्यवस्थापन, मदत व मुंबई – ४००० २० | पुनर्वसन विभाग 8.
५. ही रक्कम आरटीजीएस/एनईएफटीव्दारे तातडीने संबंधित लाभार्थीस वितरीत करावे. या योजनेवरील होणारा खर्च मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५-नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थराहाय्य, १०१ अनुग्रह राहाय्य, (९१) राज्य आपती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, (९१)(०१) रोख भत्ता, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सहाय्य जखमींना मदत (अनिवार्य), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (२२४५ ०१५५) या लेखाशीर्षाखाली पुर्नविनियोजनाव्दारे उपलब्ध
होणाऱ्या निधीमधून भागविण्यात यावा.

६. याबाबतचे देयके अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांना सादर करण्याकरिता, लेखाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, आहरण व संवितरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सह सचिव यांना नियंत्रक, अधिकारी, म्हणून घोषित करण्यात येत आहे. या योजनेखालील लाभार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात असलयाने आणि संगणकीय
प्रणालीव्दारे आधार संलग्नीत खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याने देयकासोबत्त लाभार्थ्यांचा तपशील उपलब्ध करून दिला जाणार नाही. मात्र, प्रत्येक देयकाचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांना वर्षाच्या अखेरीस सादर करण्यात येईल.

ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

सदर शासन ज्ञापन, महाराष्ट्र शासनाच्या ४www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२२०११११४५१०२६५१९ असा आहे. हे
ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *