असे काढा Driving Licence Online 2021 Apply Maharashtra | Learning Licence Online Apply in Marathi

प्रसिद्धि पत्रक
नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑन लाईन पध्दतीने जारी
करण्याची प्रणाली दिनांक १४.०६.२०२१ पासून सुरु करण्यात आली आहे.

सदर कार्यप्रणाली मध्ये महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर
अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत, तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत व व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.
वास्तविक केंद्रिय मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा
उद्देश हा को संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदा- यांचे महत्व याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. सदर प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास
सदर परिक्षेचे महत्व पटवून द्यावे तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.

नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर आज अखेर राज्यात १६९२० शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे ४०० नवीन वाहन नोंदणी करण्यात आलेली आहे.

सदर लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही यासाटी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा यथास्थिती करण्यात येत आहेत. तथापि, सध्या उपलब्ध असलेल्या
या ऑन लाईन सुविधांचा गैरवापर करणा-या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

तसंच या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा, कलम १९(इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल अशी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात येत आहेत.

अर्ज कस करायचा संपूर्ण महिती या लिंक वर https://youtu.be/1LqYpHcGMws

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, व इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थांविरुध्द पोलीस कारवाई तर केली जाईल पण या
व्यतिरिक्त, महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना
आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांना विनंती करण्यात येते की,

त्यांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

ही पण बातमी वाचाहोळी, धूलिवंदन व रंगपंचमी हे जर होणार कारवाई

सदर प्रणालीमध्ये नागरिकांना येणा-या काही इतर अडचणी जसे की, आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहीती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होत
असल्यास अथवा त्या प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *