आपले सरकार सेवा केंद्र देणे सुरू झाले| Aaple Sarkar Seva kendra VLE Registration process 2021|Maha E

विषय- रत्नागिरी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करणेसाठी अर्ज मागविणेबाबत.(Your government service center महाराष्ट्र शासन निर्णय माहीती व तंत्रज्ञान (सा. प्र. वि.) क. मातंस-१७१६/प्रा.क्र .५१७/३९ दि १९/०१/२०१८नुसार केंद्र शासनाच्या CSC २.० च्या मार्गदर्शक सूचना अन्वये जिह्यातील सध्या ज्या गावात आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत नाहीत अशा गावांची यादी http://www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली आहे.

आपले सरकार
सेवा केंद्र स्थापन करणेसाठी संबधित गावातील इच्छक व्यक्तीने या सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज माहीती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्रागिरी येथे सादर करावेत.

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी
दि. ०८/०२/२०२१ ते दि. २२/०२/२०२१
पर्यंत(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत
समक्ष सदर करावेत अथवा ditratnagiri@gmail.com यामेल आयडी बरती मेल द्वारे अर्ज स्वीकारण्याची सुविधा
उपलब्ध करून देणेत आली आहे.(Your government service center) पात्र/अपात्र उमेदवारांची यादी पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध www.ratnagiri.nic.in करणेत येईल.

आपले सेवा केंद्र

उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रखागिरी (माहीती तंत्रज्ञान विभाग) येथे
कार्यालयीन वेळेत व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह २२/०२/२०२१ पर्यंत रोजी सायं. ५ वाजेपर्यंत सदर करावेत.
उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्जासोबत सदर करावयाचे पुरावे
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. संगणकीय प्रमाणपत्र (MSCIT/Equivalent)
४. शैक्षणिक अर्हता १२ वी व त्यापुढील
५. CSC धारक असल्यास त्यासंबधित प्रमाणपत्र
६. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती खालील प्रमाणे.

१. केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आलेस त्यांच्यावर कार्यवाही करणेत येईल.

२. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे.

३. शासनाने ठरवून दिलेल्या बॅडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या
हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या
दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे.

४. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.

आपले सेवा केंद्र

५. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेल्या वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.

६. आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज ( Your government service center) करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा.

जर त्या गावातीलनागरिकाचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करणेत येईल.

७. अर्ज सदर करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत सदर करणे बंधनकारक
राहील. त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही.

८. नागरिक फक्त एकच आपले सरकर सेवा केंद्र साठी अर्ज करू शकतात.त्याच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो
ग्राह्य धरला जाणार नाही.

ही पण बातमी वाचा अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवारर

९. अर्जामध्ये माहीती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल.
१०.आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळेवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन
करावे लागेल.तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल.

११. प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्रांच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती , रत्नागिरी यांनी राखून ठेवले आहेत.

१२. जाहिरातीत दर्शवलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणामध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे. एका
केंद्राला एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य पर्यायाच्या आधारे उमेदवाराची निवड करणे याबाबतचे सर्व
अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, रवागिरीयांनी राखून ठेवले आहेत. याबाबत
जिल्हाधिकारी, रत्रागिरी यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा सांगता
येणार नाही.

१३. वरील निवेदिवाबत काही अडचणी असल्यास आवश्यक माहितीसाठी ७५०७२६४५३९ या क्रमांकावरती संपर्क
साधावा.

टीप ; फक्त रत्नागिरी जिल्हे साठी हा अर्ज आहे

सही
(लक्ष्मीनारायण मिथा)
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा सेतू समिती, रवागिरी
प्रत-
१. मा. संचालक, माहीती व तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.) मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव,
२. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांना देऊन कळविण्यात येते की, या सोबत देणेत
आलेली माहीती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
३. जिल्हा माहीती अधिकारी, रत्नागिरी यांना देऊन कळविण्यात येते की, स्थानिक वर्तमानपत्रातून सदर ची बातमी प्रसिद्ध
करावी.
४. जिल्हा महाऑनलाईन समन्वय व CSC जिल्हा प्रतिनिधी यांना कार्यवाहीस्तव.
Podle
जिल्हाधिकारी रवागिरी करिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *