ग्रामपंचायत निवडणूक 2021 || भावी सरपंच सदस्यांसाठी आनंदाची बातमी

प्रस्तावना :-

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र . ३) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे .अशाप्रकारे ग्रामसभेचे
आयोजन न केल्यास संबंधित सरपंच , उपसरपंच , आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश ,अधिसूचना निर्गमित केल्या आहेत . या शासन आदेशांनुसार सर्व प्रकारच्या सामाजिक,
राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. सदर आदेश व कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रार्दुभावाच्या दृष्टीने योग्य नाही .

हि बाब विचारात घेता, संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात
आली होती . सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने , संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन
होती.

शासन परिपत्रक:-

कोविड -१९ या आजाराचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्या कारणाने , गर्दी टाळण्याच्या दष्टीने सामाजिक व सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करणारी नियमावली वेळोवेळी सार्वजनिक
2/3 शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०२०/प्र.क्र.३१२/पंरा-३
आरोग्य विभागाने तसेच केंद्र व राज्य शासनाने शासन आदेश काढून निर्गमित केली होती .

सदर आदेशांना अनुसरून विभागाने संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र .३) च्या कलम ७ नुसार , ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती. आता, कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून
जनजीवन सुरळीत व पूर्वपदावर येत आहे .

सदर बाब विचारात घेता, तसेच , ग्राम विकासातग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेता , ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे . सबब, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना, त्यांच्या ग्रामसभा Social
Distancing चे व कोविड -१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे .
सदर आदेश हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

ही पण बातमी वाचा केंद्र सरकारचे या योजनेचा लाभ घ्या / लाखो रुपये कमवा

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०११५१४५०१०५२२० असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *