जिल्हेवाईज यादी आली यांना मिळणारा घरकूल

शासन निर्णय:-
आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत
अथवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.

त्याअनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे
प्रमाण व उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण यांनी संदर्भ क्र.१५ येथील दि.१८.२.२०२१ च्या
पत्रान्वये प्रस्तावित केलेले उद्दिष्ट/लक्षांक व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूद
लक्षात घेऊन सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता
जिल्हानिहाय उद्दिष्ट/लक्षांक निश्चित करण्यास खालील अटींचे पालन करण्याच्या अधिन राहून शासन मान्यता
देण्यात येत आहे.

१. सामाजिक आर्थिक जात जनगणना २०११ नुसार प्राथम्य यादीतील (Priority List) लाभार्थ्यांना प्रधानमंत्री
आवास- ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. वगळण्याच्या निकषानुसार (Exclusion Criteria) प्रधानमंत्री
आवास योजना-ग्रामीण मधून वगळलेल्या परंतु संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार ग्रामीण
क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादेत आहे, केवळ अशाच
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा.

२. संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देताना दिनांक २८.०३.२०१३
व दि.५.१.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमाती व पारधी
जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.

३. संदर्भ क्र.१३ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण
ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.

४. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) करुन पात्र लाभार्थ्यांची निवड
करावी.

५. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन
नियमांचे व कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

६. संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात
पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबर प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी न चुकता आयुक्त, आदिवासी
विकास आणि संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रित रित्या शासनास सादर करावा.

७. वित्त विभागाने संदर्भ क्र.१६ येथील दि.२४.०६.२०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे
पालन करण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *