दहावी मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांना मिळणार 2 लाख रु

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे.  मित्रांनो दहावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे दोन वर्षासाठी 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची महत्त्वाची घोषणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. तरी या योजनेअंतर्गत कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यासाठी चे अटी आणि निकष याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहदहावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रु. स्कॉलरशिप

मित्रांनो अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयाचे अनुदान  मिळणार आहे. अकरावी व बारावी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी एक लाख याप्रमाणे 2 वर्षासाठी हे 2 लाख रुपये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मित्रांनो अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्चशिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अनुदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलेला आहे. या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीसाठी लाभ होणार आहे.

अटी आणि शर्ती पहा

सर्वप्रथम विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा म्हणजेच SC Category चा असणे बंधनकारक आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार म्हणजेच अडीच लाखाच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला पालक आहेत त्यांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा, जातीचा दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे.  अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिलेली आहे.

ही पण बातमी वाचा 10 चा निकाल आज या वेबसाईटवर क्लीक करून पहा

 

अनुसूचित जातीचा विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि शासकीय सेवेमध्ये ज्यांचे पालक नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांची टक्केवारी 90% जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

8 thoughts on “दहावी मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांना मिळणार 2 लाख रु

  1. सरकार भिकाला लावायचा चांगला विचार आमलात आणत आहात आपण…
    कृपया अशा बातम्या गोळा करून सरकारचं बुड बसू नये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>