दारिद्रयरेषेखालील कुटूंबाच्या यादीत नोंद असलेल्या। २०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येणार

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत लाम
मंजूर करण्याबाबत.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन परिपत्रक

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाखालील राष्ट्रीय कुटुंब लाम योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटूंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षांपेक्षा कमी) कर्ता श्री/पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटूबियांना एक रकमी रुपये २०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.

दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील कर्ता स्त्री/पुरुष मृत्यु पावल्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाम योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी मृत्युच्या दिनांकापासून १ वर्षाच्या आत अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक२८.०९.२००० रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली आहे.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

आता सदरहू योजनेकरिता दारिद्रयरेषेखालील
कुटूंबातील कर्ता स्त्री/पुरुष मृत्यु पावल्यानंतर कुटूंबियांनी मृत्युच्या दिनांकापासून १ वर्षाऐवजी ३ वर्षाच्या आत अर्ज स्विकारण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. विहीत मुदतीनंतर आलेले अर्ज मंजूर करु नयेत.

अर्जदाराच्या अर्जाची छाननी काटेकोरपणे करावी. तसेच पात्र अर्जदारांनाच या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळेल याची दक्षता संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रकाची अंमलबजावणी शासन परिपत्रक निर्गमित केल्याच्या दिनांकापासून करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.poun या संकेतस्थळावर उपलब्ध
करुन देण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२००९२११६५५४८४९२२ असा आहे. हे परिपत्रक
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Sunil Vitthal Ukirade
(सु.वि. उकिरडे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रति.
१. विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/ अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
सामान परिपत्र्या प्रमांका विसयो-२०२०/…/वित्यो
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन.५वा मजला. महाराष्ट्र राज्य,मुंबई

४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई प्रती)

५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२. (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.

७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३.४.५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई.

८. सह सचिव अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

९. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा, लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय,
मुंबई.

१०.मा.राज्यमत्री/मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) यांचे खाजगी सथिय, मंत्रालय, मुंबई.

११.निवड नस्ती, विसयो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *