नवीन मतदार नोंदणी
- सर्व मतदारांना कळविण्यात येते की भारत निवडणूक आयोगाच्या मतदारनोंदणी पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत सलग दोन शनिवार व रविवार म्हणजेच दिनांक ०५ व ०६ डिसेंबर तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष कॅंपचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या सर्व मुले व बाहेर गावाहून विवाहित होऊन आलेल्या मुलींची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच जुन्या मतदारांची नाव, वय, लिंग, फोटो चुकीचा असल्यास ते ही दुरुस्ती करण्यात येईल. त्यासाठी खालील कागदपत्रे घेऊन आपापल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०: ०० ते सायं. ५:०० या वेळेत BLO शी संपर्क साधावा.
ही पण बातमी वाचानवीन मतदान यादी आपल्या गावाची यादी अशी डाउनलोड करा / नाव पहा तुमचा
मुल/मुलींसाठी कागदपत्रे
(१) स्वतः चे आधारकार्ड झेरॉक्स
(२) शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स.
(३) रेशनकार्ड झेरॉक्स/ ग्रांमपंचायत रहिवाशी दाखला.
(४)फोटो १
(५) वडील/ आई चे मतदान कार्ड झेरॉक्स.
सुनांसाठीची कागदपत्रे
(१) आधारकार्ड झेरॉक्स.
(२) शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स.
(३) माहेरी मतदारयादीतील नाव कमी केल्याचा/नाव नसलेबाबतचा पुरावा.
(४) फोटो १
(५) पती/सासू/सासरा यांपैकी एकाच्या मतदान कार्डची झेरॉक्स.
(६) सासरी रेशनकार्डमध्ये नाव असल्यास झेरॉक्स.
दुरुस्तीसाठी
(१) ज्या बाबींची दुरुस्ती करायची आहे त्या पुराव्याची झेरॉक्स.
(१) फोटो १
Yes