पुण्यामध्ये मिळणार स्वस्तात घर || ऑनलाईन अर्ज सुरु || महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रहिवाशी पात्र

ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

पुणे मंडळातील सदनिकांच्या विक्रीसाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीचे वाटप) नियम-१९८१ व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळयांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम-१९८१ यामधील तरतुदी अनुसार व त्या त्या वेळी, अवस्थाप्नत लागू केल्या जाणाऱ्या तरतूदींच्या अधीन राहून इच्छुक अर्जदारांकडून या सदनिकांच्या विक्री करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

३.१. अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
३.२. अर्जदार किंवा त्यांची पत्नी / पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर,
भाडे खरेदी पध्दतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून अर्ज
करीत असलेल्या योजनेच्या मनपा/नपा हद्दीत गाळा / घर किंवा निवासी भुखंड नसावा.

३.३. जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्रातील मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये, अर्जदाराचे किमान १५ वर्षाचे
वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate रहिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. (केंद्र शासन कर्मचारी (CG) प्रव 12/76
आरक्षण वगळून)

३.४. अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे. ” कौटुंबिक मासिक उत्पन्न ” म्हणजे अर्जदाराचे स्वत:चे एकटयाचे
व त्यांची पत्नी / पती यांची मासिक प्राप्ती असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीवितार्थाचे सर्वसाधारण दिनांक ०१/०४/२०१९ ते ३१/०३/२०२० या
कालावधीत झालेल्या प्राप्तीवरुन परिगणीत करण्यात यावे. उत्पन्न या संज्ञेत पगार, मूळ वेतन, महागाई भत्ता, शहर भत्ता, बोनस, आदि तत्सम भत्ते यांचा समावेश राहील. तथापि
घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, अतिकालिक भत्ता, किट भत्ता, वाहन भत्ता इत्यादी भत्ते व यासारखे भत्ते जे प्रतीपूर्तीसाठी (Reimbursable Allowance) देण्यात येतात त्यांचा समावेश असणार नाही.

पुण्यामध्ये मिळणार स्वस्तात घर || ऑनलाईन अर्ज सुरु || महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रहिवाशी पात्र

माहितीची pdf लिंक

https://lottery.mhada.gov.in/OnlineAp…

अर्ज करण्यासाठी लिंक…….

https://lottery.mhada.gov.in/OnlineAp…

अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न गटनिहाय खालीलप्रमाणे असणे आवश्यक
राहील.
उत्पन्न गट
अत्यल्प उत्पन्न गट (EWS)
अल्प उत्पन्न गट (LIG)
| मध्यम उत्पन्न गट
(MIG)
| उच्च उत्पन्न गट (HIG)
कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा
रु.२५,०००/- पर्यंत
रु.२५,००१/- ते रु. ५०,०००/- पर्यंत
रु.५०,००१/- ते रु. ७५,०००/- पर्यंत
रु.७५,००१/- वा त्यापेक्षा जास्त
३.५. द नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर फॉर पर्सन्स विथ ऑटिस्म, सिरब्रल पालसी, मेंन्टल
रिटार्डशन अॅण्ड डिसॅबिलिटिज, अॅक्ट १९९९ मधील प्रकरण ६ मधील कलम १३ ते १७
मधील तरतूदींच्या अधिन राहून गतीमंद (Mental Retired) व मनोविकृत (Mental
Illness) अर्जदारांच्या वतीने संबंधित व्यक्ती / संस्था अर्ज करु शकतील व या स्वरुपाचे
10
अपंगत्व असलेल्या व्यक्तीस सदनिकेचे वितरण करताना त्याचे वैयक्तीक उत्पन्न विचारात
घेण्यात येईल,
४.
वितरणासाठी सदनिकांची उपलब्धता व अर्ज सादर करण्याची पध्दत :-
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीचे वाटप) नियम १९८१ मधील नियम १३ च्या
तरतुदीनुसार जाहिर करण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेतील सदनिकांचे आरक्षण ठेवण्यात येते.
-: सोडत जानेवारी २०२१ साठी अर्ज भरण्याची पध्दत खालीलप्रमाणे आहे :-
४.१ म्हाडा लॉटरी संकेत स्थळावरील https://lottery.mhada.gov.inयेथे अर्जदाराने सर्व प्रथम
स्वत:ची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नोंदणी करण्याचा
कालावधी दि.१०-१२-२०२०ते दि.११-०१-२०२१रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल याची
कृपया नोंद घ्यावी. (अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती Help File मध्ये दिलेली आहे.)
नाव नोंदणीसाठी अर्जदाराने अर्जामध्ये विहीत केलेली माहिती अर्जदाराने भरणे आवश्यक
आहे तसेच *अशीखुण असलेली माहिती भरणे बंधनकारक आहे.अशी बंधनकारक माहिती
व ड्रॉप डाऊन मधील माहिती फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध राहील.
४.३ अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करणेपूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी, म्हणजे अर्ज भरणे
४.२
सुलभ जाईल.

१. नाव
२. उत्पन्न गट
३. आरक्षण प्रवर्ग
४. अर्जदार सध्या राहात असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोड क्रमांक.
५. अर्जदाराची जन्मतारीख (पॅनकार्ड प्रमाणे).
६. आधार क्रमांक (UID No.)
७. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशिल
अर्जदाराच्या स्वत:च्या बचत खात्याचा तपशील जसे, बँकेचे नाव, शाखा व पत्ता, खाते
क्रमांक, बँकेचा MICR / IFSC क्रमांक दयावा. अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक
खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही, असे केल्यास अर्ज अवैध ठरविण्यात
येतील. तसेच चालु खाते, संयुक्तीक खाते एन.आर.आय. खात्याचा तपशील चालणार
नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *