बांधकाम कामगारांनासाठी नवीन योजना चालू / आता यांना मिळणार

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देणेबाबत.
महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग

प्रस्तावना :-
इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु
होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते.

अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते.

त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक २७.१०.२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला.

सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत लाभार्थी बांधकाम (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) कामगारांच्या गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांचेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील.

नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकम)/ सरकारी कामगार.

नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांना गृहपयोगी वस्तू संच पुरविण्याबाबत ई-निविदा पध्दतीचा अवलंब
करावा व नोंदणीकृत, नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी.

गृहपयोगी वस्तू संचाची निविदा स्विकृत करण्यापूर्वी गृहपयोगी वस्तू संचामधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करुन घ्यावी.

वस्तू व सेवाकर (GST) वगळता पॅकिंग, पुरवठा, वाहतूक, साठवणूक, विमा, वितरण, बायोमॅट्रीक,फोटो, मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहपयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहील. गृहपयोगी वस्तू संचातील वस्तूंवर मंडळाचे नाव नक्षीदारपणे व कोरीव होणे (Embossing/ Laser Engraving) अनिवार्य आहे.

बांधकाम कामगारांनासाठी नवीन योजना चालू / आता यांना मिळणार

नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांना गृहपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यावर सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकम) हे कामगार उप आयुक्त (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मइवइबाकम) यांना पोचपावती सादर करतील.

ग्रामपंचायत निवडणूक 2021 || भावी सरपंच सदस्यांसाठी आनंदाची बातमी

कामगार उपआयुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांचेकडून पोचपावती प्राप्त झाल्यावर देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांना अहवाल सादर करावा.

कामगार उपआयुक्त (उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
मइवइबाकम) यांचेकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देयकाची अदायगी करेल.

१०. गृहपयोगी वस्तू संच वितरीत करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांचे छायाचित्र काढणे व बायोमॅट्रीक पध्दतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील.

११. गृहपयोगी वस्तू संच वितरणाकरीता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबीर (Camp) आयोजित करण्यात येतील.

१२. गृहपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. पुरवठयाचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे
अधिकार मंडळास राहतील.

१३. गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *