सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी
७ कोटी ३८ लाखाचे बक्षिस पटकावले…
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात येईल,भारताला पहिल्यादाचं हा बहुमान मिळाला आहे,जगभरातील १४० देशांतील जवळपास १२ हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि त्यांची यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच सातत्याने राज्यातील उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणत असतो. संदीप गुंड, बालाजी जाधव आणि रणजितसिंह डिसले ही काही ठळक उदाहरणे. शिक्षण विकास मंचच्या २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या “उपक्रम: वेचक-वेधक” या पुस्तकात रणजितसिंह डिसले यांचा “स्वयंशिस्तीतून आरोग्याच्या सवयी” आणि याच पुस्तकाच्या २०१५ च्या सुधारित आवृत्तीत त्यांचा “पालक आणि सोशल मीडिया” हा लेख प्रकाशित झाला होता. २०१३ आणि २०१४मध्ये राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगला प्रोत्साहन मिळावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत शिक्षकांना देण्यात आलेल्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्येसुद्धा त्यांचा समावेश होता.
अभिमानास्पद…
रणजितसिंह_डिसले
ग्लोबल टीचर प्राईझ 2020 करिता जगभरातून आलेल्या 12 हजाराहून अधिक नामांकनातून
भारतातील एकमेव शिक्षक यावर्षी विजेता ठरला.
मा रणजितसिंह डिसले सर जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले ही_बार्शीसह_महाराष्ट्राला_अभिमानाची_गोष्ट_आहे
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर !
जगातील_सर्वोत्तम_शिक्षक_म्हणून_गौरव,
भारताला_पहिल्यादाचं_मिळाला_सन्मान !.
ही बातमी पण वाचा मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करा / फक्त 5 मिनिटात/ aadhar card download mobile
जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा..