सन २०२० या वर्षात राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर शासनाने केलेल्या
उपाययोजनांमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने राज्य शासनाने
टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रथमत: दि.१०
नोव्हेंबर, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये इ.९ वी ते १२ वी चे वर्ग काही अटी-शर्ती निश्चित करुन दि.२३
नोव्हेंबर, २०२० पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर दि.१८ जानेवारी, २०२१ रोजीच्या
परिपत्रकान्वये इ.५ वी ते ८ वी चे वर्ग दि.२७ जानेवारी, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.
तथापि, त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्यामुळे राज्य शासनाने
दि. १५ एप्रिल, २०२१ पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या
उपाययोजनांमुळे राज्यातील लॉकडाऊन उठविण्यात आले. त्यामध्ये राज्य शासकीय कार्यालयातील
उपस्थिती टप्याटप्याने वाढविण्यात आली आहे.
तसेच इतर आस्थापना देखिल सुरु करण्यास
टप्याटप्प्याने मान्यता देण्यात आली आहे.
शासन परिपत्रक क्रमांका संकीर्ण :२०२१/प्र.क्र.९४/एसडी-६ मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने त्यांच्या दि.१४ जून, २०२१ च्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात दि.१५ जून, २०२१ पासून व विदर्भात दि.२८ जून, २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत जाहिर केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी केलेल्या उपायोजनांचा उल्लेखदेखिल सदर पत्रात करण्यात आला आहे. तसेच सदर
पत्रान्वये वरील दिनांकापासून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश देण्यात आले आहे.
राज्यात कोविड संबंधी data/ आकडेवारी व तज्ञांचे मत लक्षात घेता असे दिसते की, सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोविड संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे, तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी सदर
संसर्ग होण्याची कमी शक्यता आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत व त्यामुळे
त्यांच्यावर शारिरीक, मानसिक व psychological दुष्परिणाम होत आहे, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान
होत आहे.
पुढे जाऊन जस-जसे दिवस जातील, तस-तसे सदर नुकसान भरून काढणे कठीण जाईल.
शाळा बंद व मुलं घरी राहण्याचे अजून जे दुष्परिणाम लक्षात आले आहेत त्यात socialization म्हणजे
सामाजिक कौशल्यांचे नुकसान, मोबाईल/ इंटरनेटचा गैरवापर व games चा addiction, depression,
online शिक्षणापासून वंचित राहणे त्यामुळे मानसिक तणाव, काही मुलांनी केलेली आत्महत्या, domestic
violence चे वाढते प्रमाण, बाल-विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे drop-outh
शेती कामात ठेवणे इ. मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा
लाभ व्हावा यासाठी कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
ही पण बातमी वाचा या तारखी पासून पाऊस सक्रिय होणार
परिपत्रक:
या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती / स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या ठरावांनी खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता
१२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
आ) ग्रामीण भागात कोविड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील
शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.