हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा २००५ नुसार वडील जिवंत असतील किंवा नसले तरी देखल मुलीला संपत्तीत समान हक्क मिळेल असे काही दिवस अगोदर बातम्या होते. वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीला देखील समान वाटा दिला जावा, याबाबतचा मोठा निर्णय काही दिवसां अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास
मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा जर मृत्यू झाला तरी प्रत्येक वारसांना जमीन घर मालमत्तेवर समान हक्क असतो. तसेच मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर संपूर्ण हक्क असतो. यामध्ये विधवा पत्नी , मुली आणि मुले तसेच इतरा वारशाचा समावेश असतो.
२००५ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच फक्त हा कायदा लागू आहे का?… हे सुध्दा आपण पाहणारा आहे
ही पण बातमी वाचा महाराष्ट्रसाठी धक्कादायक बातमी महराष्ट्रात पुन्हा नवीन कोरोना
भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला अनुसरून २००५ नंतर वा त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसाहक्क या खंडपीठाने मान्य केला. २००५ आधी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींना हा वारसाहक्क लागू असला तरी २००५ साली जर ही स्त्री जीवित असेल तरच तिला हा हक्क लागू होतो.
जर स्वत: कमवलेली मालमत्ता असले तर
वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेवर, मुलींचा कोणतीही हक्क नसतो. कारण जर वडिलांनी स्वतःता जमीन विकत घेतली असेल, तर वडील ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. वडिलांचे इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकारसुध्दा आहे.
वडिलोपार्जित घर शेत मालमत्ता असेल तर
२००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्ती नंतर वडील त्यांच्या मानणे अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार कधी चा देऊ शकत नाही. आता नवीन कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो आणि मिळणार .