स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी ठाकरे सरकार देणारा १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.

राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले तरुण युवक  आहेत. या तरुण पैलू पडण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घ्यावे. ज्यांना नवीन काही करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना साधनसंपत्ती आणि मार्गदर्शन देऊन जगासमोर आणा, असे आवाहन आपले राज्यचे  मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या अर्थसहाय्य योजनेचे.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक बद्दल

महाराष्ट्र स्टार्टअप वीक हा राज्यातील उद्योजकीय पर्यावरणाला (इकोसिस्टीमला) प्रोत्साहन देण्याचा आणि सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न आहे. या सप्ताहामुळे नवउद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध होते, ज्याद्वारे ते समस्या निवारणाच्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना महाराष्ट्र शासनासमोर सादर करू शकतात.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

शिक्षणक्षेत्र, कौशल्यविकास, आरोग्यसुविधा, कृषी, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, जल आणि कचरा व्यवस्थापन, अद्ययावत पायाभूत व्यवस्था आणि चलनवलन, अधिशासन आणि इतर क्षेत्रांतील स्टार्टअप्सना अर्ज दाखल करण्यासाठी इथे आमंत्रित करण्यात येते.

विविध इकोसिस्टीम पार्टनर्सच्या मदतीने, सहभागी स्टार्टअप्सपैकी सर्वोत्कृष्ट 100 स्टार्टअप्स ची तज्ज्ञ परीक्षकांकडून निवड केली जाते. या निवडक 100 नवउद्योजकांना एखादी विशिष्ट समस्या सोडवण्यासंदर्भातली नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची संधी मिळते. सदर परीक्षकांमध्ये शासकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि गुंतवणूक क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश असतो. आठवडाभर चालणार्‍या या कार्यक्रमामध्ये, निवडला गेलेला प्रत्येक नवउद्योजक हा वरिष्ठ सरकारी अधिकारी, औद्योगिक विशेषज्ञ, शैक्षणिक विशेषज्ञ आणि व्यावसायिक भागीदारांचे गट यांच्यासमोर आपल्या स्टार्टअपचे सादरीकरण करतो.

आता 100 पैकी एकूण 24 स्टार्टअप्सना विजेते म्हणून निवडण्यात येते. त्यांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून 15 लाखांपर्यंतचे कार्यादेश (वर्क ऑर्डर्स) प्राप्त होतात. तसेच, या नवउद्योजकांना त्यांची उत्पादने किंवा सेवा प्रत्यक्षात देण्यासाठी शासकीय यंत्रणेचा लाभ मिळतो; आणि शासनाच्या संस्थात्मक भागीदारांकडून 12 महिन्यांपर्यंत मार्गदर्शन देण्यात येते.

इथे क्लीक करून नक्की बातमी वाचा जर तलाठ्यानी हे नाही केला तर होणार कार्यवाही

यात सहभागी होणार्‍या स्टार्टअप्सना इतर अनेक लाभ मिळतात. जसे – क्लाउड क्रेडीट, अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागाची संधी, इकोसिस्टीममधील मार्गदर्शक, गुंतवणूकदार यांसारख्या घटकांशी

इथे वलीक करून तुमि सहभागी होऊ शकता

https://mh.gov2egov.com/GeneralPages/HomeNew.aspx

 

6 thoughts on “स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी ठाकरे सरकार देणारा १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>