हे जर केलेस सरपंच, उपसरपंचांना घरचा रस्ता / गृप

ग्रामसभेला न विचारता निधी खर्च

बीड दि.२८(प्रतिनिधी):-ग्रामसंसद ही मोठी व्यवस्था असुन त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आलेला आहे. गावात आलेला विकासाचा पैसा ग्रामपंचायतमध्ये खर्च करण्यासाठी येईल, ग्रामपंचायत अकाऊंट ठेवील परंतु तो निधी ग्रामसभेला न विचारता खर्च केल्यास आणि गावातील,२० टके ग्रामस्थांनी सह्यानिशी अर्ज केल्यास सरपंच, उपसरपंचांना थेट घरचा रस्ता दाखविता येवु शकतो.

ग्रामसेवकही बडतर्फ होऊ शकतो, त्यासाठीयुवकांनीग्रामसभेच्या कायद्याचा अभ्यास करावा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णाहजारे यांनी केले आहे.

दिल्ली आणि राज्याच्या संसदेपेक्षाही ग्रामसंसद महत्वाची आहे. या दृष्टीकोनातुन तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ग्रामसभेसाठी विशेष कायदा केला.

गावात आलेला विकासाचा पैसा ग्रामपंचायतमधुनच खर्च होईल, त्याचा हिशोबही ग्रामपंचायत ठेवेल, परंतु तो पैसा गावातील कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा? यासाठी ग्रामसभेची मान्यता महत्वाची आहे.

http://aamhishetkaree.com/?p=1997

ग्रामसभेला न विचारता निधी खर्च केल्यास आणि गावातील२० टक्के ग्रामस्थांनी या संदर्भात सह्यानिशी वरीष्ठांकडे अर्ज सादर केल्यास सरपंच, उपसरपंच हे थेट घरी जावु शकतात तर ग्रामसेवक बडतर्फ होवु शकतो, अशी तरतुद कायद्यामध्ये आहे, त्यासाठी युवकांनी प्रथम ग्रामसभेच्या कायद्याचा अभ्यास करावा आणि विकास कामाच्या बाबतीत सतर्क राहावे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *