विषय :- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०२१ मधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ DBT द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याबाबत.
केद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ (NFSA) अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ५ किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे. ।
केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन
२०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय
पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन केलेले आहे.
केंद्र शासनाच्या उपरोक्त नियोजनाप्रमाणे योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उन्हाळी सुट्टीच्या
कालावधीतील आहार खर्चाची रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचा निर्णय
संदर्भ पत्र क्र.२ अन्वये शासनाने घेतला आहे. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेस
पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बॅक खाते माहिती खालील विहित नमुन्यात अद्ययावत करुन तयार ठेवण्यात
यावी, तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले नसेल. अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बैंक खाते
उघडण्याबाबत संबंधिताना आपल्यास्तरावरुन लेखी सूचना निर्गमित करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यातील
शापोआ योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे १००% बँक खाते उघडण्यात यावेत.
ही पण बातमी वाचा धक्कादायक बातमी सरसकट बंद बंद पुन्हा लॉकडाऊन
दिनांक ०९जुलै, २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी, जेणेकरुन शासनस्तरावरुन पुढील निर्देश प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्याकरीता सदर माहिती उपलब्ध करुन देणे
शक्य होईल. बॅक खाते उघडण्याकरीता शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश आपल्या
स्तरावरुन सर्व शाळांना निर्गमित करण्यात यावेत.