आपले वाहन चोरीला गेलेस आता पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही

आपले वाहन चोरीला गेलेस आता पोलीस
स्टेशनला जाण्याची गरज नाही

आता आपले वाहन चोरीला गेल्यास पोलीस मध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र पोलीस विभागाने ”
Vahanchoritakrar” वाहन चोरी तक्रार ” नावाचे
एक नविन पोर्टल नुकतेच सुरु केल आहे. या द्वारे आपण आता आपल्या वाहन
चोरीची तक्रार घर बसल्या, सायबर कैफे मधुन किंवा आपल्या मोबाईल वरुन देखील
कोठुनही ” विनाशुल्क ” नोंदवु शकता. तसेच तपासा बाबत सद्यस्थिती जाणून घेवुशकता.

या करीता नागरीकाना महाराष्ट्र पोलीस विभागाने “ऑनलाईन” सुरु केलेल्या “पोर्टल” वर जावुन प्रथम नोंदणी करावी लागेल.

नोंदणी करीता आवश्यक बाबी :-

1. संगणक, अँड्रॉइड मोबाईल फोन
2. इंटरनेट कनेक्शन
या नोंदणी मध्ये खालील माहिती “अचुक” भरावी लागेल.
1.www.vahanchoritakrar.com या वेबसाईट वर जा.
2. तेथे स्वतःचा मोबाईल नंबर
2. ई-मेल आय डी
3. आधार कार्ड नंबर
4.स्वतःचे नाव
5. स्वतः चा पासवर्ड ठरवुन (Desired Password) भरावा लागेल.
6. विनंती रजिस्टर करावी लागेल.

नंतर ओळख पट्विण्यासाठी (OTP) पासवर्ड आपण नोंदवलेल्या ई-मेल वर येईल.

तो पासवर्ड बॉक्स मध्ये भरून सबमीट करून नोंदणी करावी लागेल. तुमची नोंदणी (Registration) झाल्यानंतर तुम्ही तुमचा नोंदवलेला मोबाईल नंबर, ठरवलेला पासवर्ड आणी वेरीफिकेशन कोड (Captcha) टाकून लॉग-इन करू शकता. लॉग-इन केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचे जे वाहन हरवले किंवा चोरीला गेले या बाबत तक्रार नोंदवु शकता.
या मध्ये
1. वाहनाचा प्रकार
2. वाहन बनवलेली कंपनी
3. वाहनाचा RTO नोंदणी क्रमांक
4. चेसीस नंबर
5. इंजिन नंबर
6. मॅनफ़ैक्चर वर्ष
7. व्हेईकल मोडेल
8. वाहनाचा रंग
9. वाहन ज्याच्या नावावर आहे त्याचे नाव
10. वाहन जेथुन चोरीला गेले आहे ते ठिकाण
11. जिल्हा
12. चोरीला गेलेला कालावधी नमुद करावा लागेल.
आपली तक्रार पोर्टलला एकदा नोंद झाल्यानंतर, ती तक्रार वाहन ज्या पो. ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधुन चोरीला गेले आहे, त्या पो. ठाण्याकड़े वर्ग होईल. नंतर पोलीस आपणाशी संपर्क करतील.
तुम्ही आवश्यकते नुसार तुमचा प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) केव्हाही अप-डेट करू शकता.

ही पण बातमी वाचा राष्ट्रवादीचा भाजपला जबर दणका! उद्या ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?NCP Latest News Today

तक्रार खोटी, चुकीची, कोणाला त्रास देण्याच्या हेतुने नोंदविल्यास
कारवाई होवु शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *