1 फेब्रुवारी पासून यांचा रेशन कार्ड बंद होणार/ration card maharashtra

अपात्र शिधापत्रिका मोहिम राबविण्याबाबत. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

 

दिनांक:२८ जानेवारी, २०२१

केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द (ration card maharashtra) करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था ( नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे.

त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे. राज्यातील कार्यरत बी.पी.एल. अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची(ration card maharashtra )तपासणी करणेसाठी शोध मोहिम दि.०१.०२.२०२१ ते ३०.०४.२०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात यावी. सदर शोध मोहिमेत

खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

(अ) सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून (ration card maharashtra )माहिती घेणे-:

(१) शहरातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या (ration card maharashtra )शिधापत्रिकांची तपासणी करावी..

(२) वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील / कार्यालयातील रास्तभाव / अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी / तलाठी यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील.

(३) शासकीय कर्मचारी / तलाठी यांनी संबंधीत रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून( ration card maharashtra)माहिती भरून दिलेले फॉर्म स्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व
दिनांकासह पोच देण्यात यावी..

(४) फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र ( कार्यालयीन/ इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जूना नसावा..

रेशन कार्ड ऑनलाइन

(५) आममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेवून, सर्व फॉर्म यादीसह संबधित शासकीय कर्मचारी/तलाठी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा
करावेत.

शासन परिपत्रक क्रमांकः शिवाप-२०२१/प्र.क्र.०४/नापू-२८
वरील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे..

(ब) आलेल्या माहितीची तपासणी करणे :-
१) वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या नमुन्यांची त्यासोबतच्या कागदपत्रांच्या तपासणी पुरवठा क्षेत्रीय कार्यालयांनी करावी.

२) वरील छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी “गट अ” म्हणून करावी. तर “गट ब” मध्ये पुरावा न देणाऱ्यांची यादी करावी.३) “गट-अ” यादीतील शिधापत्रिका धारंकाची शिधापत्रिका पुर्ववत चालू/कार्यरत राहील

हे पण बातमी वाचा कुक्कुटपालन वर मिळणार अनुदान / अर्ज भरणे सुर

४) “गट-ब” यादीतील शिधापत्रिका त्वरीत निलंबित करण्यात याव्यात. अशा शिधापत्रिकेवर शिधावस्तू देण्याचे त्वरित थांबविण्यात यावे. व त्यानुसार दुकानदारास देण्यात येणाऱ्या
नियतनात कपात करण्यात यावी.

५) वरील १ ते ४ प्रमाणे कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी.

६) “गट ब” यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना आणखी १५ दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा देण्यास सांगावे.

आवश्यकतेनुसार पुरावा देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही पुरावा न आल्यास, पुरावा देऊ न शकलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. ही कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावी.

(क)वरील (आ व (ब) प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता :-

 

१) शिधापत्रिकेची तपासणी करताना, एका कुटुंबात व एका पत्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळया शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबधित तहसीलदार अथवा तहसील दर्जाच्या अधिकाऱ्यांनी/शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा.

२) एकाच पत्यावर दोन शिधापत्रिका। ration card maharashtra कुटुंबामध्ये देताना, दोन्हीही शिधापत्रिका बी.पी.एल. अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत.

३) वरील “गट अ” व “गट ब” मधील यादी जनतेस व प्रसिद्धी माध्यमास देण्यास प्रत्यवाय राहणार नाही.

One thought on “1 फेब्रुवारी पासून यांचा रेशन कार्ड बंद होणार/ration card maharashtra

  1. रेशन कार्ड बंद होणार? रेशन कार्ड चा RC नंबर आम्हाला मिळालाच नाही बंद करून उपयोग काय तहसील मध्ये अर्ज देऊन एक एक वर्ष होऊन जात तरी RC नंबर मिळत नाही तहसील कार्यालय मध्ये अर्ज दिल्यानंतर 15 दिवसापर्यत RC नंबर मिळाला पाहिजे पहिले याची सुधारणा करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>