Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य
शासनाच्या अनुदानाची भर घालणारी, “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना घोषित करण्यात
आली. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या
प्रतिवर्ष प्रति शेतकरी रु.६०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.६०००/- इतक्या निधीची
भर घालणारी ” नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन
निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सदर योजने अंतर्गत लाभार्थीना ला
एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्र 2/4 रि
एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता
देण्यात आली आहे.
—
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता,
दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता तसेच, सहावा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्र. (३), (४), (५),
(७), (८) व (९) अन्वये वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेचा २० हप्ता
दि.०२/०८/२०२५ रोजी वितरीत केला असून त्यानुषंगाने संदर्भ क्र. (१०) व (११) येथील पत्रान्वये, सन
२०२५-२६ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशिर्षा अंतर्गत मंजूर तरतूदीमधून प्रस्तुत
योजनेअंतर्गत, सातव्या हप्त्याचा (माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा
करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. कृषि आयुक्तालयाने पी. एम. किसान
योजनेच्या २० व्या हप्त्याच्या FTO डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत
सातव्या हप्त्यावेळी देय लाभ, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत PFMS Registration
Pending Beneficiaries, Aadhar Deseeded Beneficiaries याकरिता एकूण रु. १९३२.७२ कोटी
इतका निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यास अनुसरुन, नमो शेतकरी महासन्मान निधी
योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.
:-
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा (माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५)
लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. १९३२.७२ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता
देण्यात येत आहे.
२