अटल बांधकाम कामगार आवास योजना, महत्वाचा बदल Gr आला

प्रस्तावना :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) राबविण्यास संदर्भाधीन दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात
आलेली आहे आणि संदर्भाधीन दिनांक ०७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये घर बांधणीसाठी,

जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगिक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी रु. ५०,०००/- इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

संदर्भाधीन दिनांक ०४ जुलै, २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील अटीमुळे योजनेचा लाभ घेण्यास येणा-या अडचणी दुर करण्यासाठी अटीत बदल करुन बांधकाम कामगाराच्या नोंदणीचा दिनांक निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही पण बातमी वाचा दोन व्यक्तींना मिळाला एकच बँक खाते क्रमांक! एक पैसे टाकायचा, दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा!

शासन निर्णय :-

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी संदर्भाधीन दिनांक ०४ जुलै,२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली कालमर्यादा शिथील करण्यात येत असून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यन्त
नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना या योजनेत अर्ज करता येईल.

wp_footer(); ?>