मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजना ( Chief Minister Tirtha Darshan Yojana )

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना
भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास
मान्यता देण्यात येत आहे.

१. योजनेचे नाव :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
२. सदर योजनेचे उद्दिष्ट :- राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे.

३. योजनेची व्याप्ती :- सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश
राहील. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट- “अ” व “ब” प्रमाणे असेल. सदर
यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर
योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला
या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती
व्यक्ती रु. ३०,०००/- इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व
बाबींचा समावेश असेल.
४. योजनेचे लाभार्थी :- महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक
५. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-
(१) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(२) वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक.
(४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

Chief Minister Tirtha Darshan Yojana


६. अपात्रता :-
(१) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(२) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर
निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि रु. २.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले
बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
(४) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे
अध्यक्ष/उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत.
(५) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत
आहेत.
(६) प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही
संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा,
कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इ.
(७) अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर
ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी राक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे)
(८) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही
त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही…

fol असे आढळून आले की अर्जदाराने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही गे लावन

रेशन कार्ड मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )

(९) जर असे आढळून आले की अर्जदार / प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून
अर्ज केला आहे ज्यामुळे तो/तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या
लाभांपासून वंचित ठेवता येईल.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास
शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
७. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :-
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड/ रेशनकार्ड
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे १५ वर्षापूर्वीचे
१. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या चारपैकी
कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल)
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक
लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड
(५) वैद्यकीय प्रमाणपत्र.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
८. रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टूरिस्ट कंपन्यांची निवड :-
3/14
सदर योजनेंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच
रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा
प्रक्रियेद्वारे करण्यात येईल.
९. लाभार्थ्यांची निवड :-
प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे
पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल.

  1. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये
    अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला
    जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत
    ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील
    तयार केली जाईल.

    २.
    निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास
    पाठवता येईल.
    ३. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि
    समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा
    इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल.
    ४.
    फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो / ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही
    व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
    ५. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि
    दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे
    त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
    १०. प्रवास प्रक्रिया :-
    १. जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडे
    सुपूर्द केली जाईल.
    २. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सीला देण्यात देईल.
    ३. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था
    करेल.
    ४. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा
    निर्णय राज्य शासन घेईल.
    ५. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.
    (अ) रेल्वे / बसने प्रवास:-
    १. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी
    संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.

Chief Minister Tirtha Darshan Yojana

ABMarathi
ABMarathi
Articles: 170

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *