अशी बंद करा कोरोनाची कॉलर ट्यून

अशी बंद करा कोरोनाची कॉलर ट्यून
पुणे, ता. ४ : ‘नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड १९ से…’ अमिताभ बच्चन किंवा इतर उद्घोषकांच्या आवाजाने आपल्या प्रत्येकाचा कॉल सुरू होतो. तब्बल दीड वर्ष अशी कॉलर ट्यून आपण ऐकतो आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या कॉलरट्यूनमुळे इरिटेड’ होत आहे. यापासून सुटका करून घ्यायची असले तर काही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

ही पण बातमी वाचास्कुटर पासून कार पर्यँत सर्व इलेक्ट्रिक वाहन खरेदी साठी अनुदान

एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी कोरोनाची
कॉलरट्यून थांबविण्यासाठी एसएमएस आणि मिस्डकॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. एअरटेल ग्राहकांनी मोबाईलच्या किपॅडवर *६४६*२२४# असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक प्रेस करावा.

घरकूल यादी मोबाईल वर डाउनलोड करा

तर जिओ ग्राहकांनी STOP हा संदेश टाइप करून १५५२२३ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर येणाऱ्या संदेशाच्या आधारे पुढील
कार्यवाही करावी. तर भारत संचार निगम लिमिटेडच्या
UNSUB हा संदेश ५६७०० किंवा ५६७९९
या क्रमांकावर पाठवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *