Free Tablet Yojana 2022 Mahajyoti Registration

वर्ग 11 वी सायन्स मध्ये या वर्षी प्रवेश घेणाऱ्या व घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी
JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी आता Free Tablet Yojana
मोफत नोंदणी करा!
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्याथ्र्यांना 2024
च्या JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण! आता दहावी पास झालात, अकरावी विज्ञान
शाखेत प्रवेश घेतला. 2024 च्या 12 वी परीक्षेनंतर इंजिनिअर, मेडीकल साठी परीक्षा द्यावयाची आहे.
पण महागडे कोचिंग क्लास लावणे जड जाते! काळजी करू नका!

ही पण बातमी वाचा कॉविड सर्टिफिकेट मोबाईल वर डाउनलोड करा

महाज्योती आपणास या स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देईल. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपणास
प्रशिक्षणासोबत,  Free Tablet Yojana सोबत मोफत दररोज 6 जीबी इंटरनेट डाटा व स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मोफत देईल.
त्यासाठी महाज्योती वर मोफत नोंदणी www.mahajyoti.org.in यावर करावयाची आहे. शहरी विभागात
शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या मार्च 2022 च्या दहावीच्या परीक्षेत 70% तर ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील
विद्याथ्र्यांना 60% मार्क्स असणे आवश्यक आहे.
सोबत ओबीसी भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास वर्ग विद्याथ्र्यांनी जातीचे व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र,
महाविद्यालयाचे वर्ग 11 वी सायन्स मध्ये शिकत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आपण महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावून तिथे JEE, NEET, MH-CET
नोटीस बोर्ड वर क्लिक करून, आपला प्रवेश नोंदणी अर्ज ऑनलाईन अपलोड करा व महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *