राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटूंबियांसमोर उद्भवलेला बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन त्यांना अनुदान स्वरुपात लाभ देण्याच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या दि.१२.०८.२०२० च्या बैठकीमध्ये खावटी अनुदान योजना राबविण्यासमान्यता देण्यात आलेली आहे.
ही पण बातमी वाचा केंद्र सरकारचे या योजनेचा लाभ घ्या / लाखो रुपये कमवा
यास अनुसरून संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ या वर्षात खावटी अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रति कुटुंब एकूण रू.४०००/- इतक्या रक्कमेचा लाभ
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यापैकी रू.२०००/- इतकी रक्कम लाभार्थ्याच्या बँक/ डाक खात्यात थेट स्वरुपात तर रू.२०००/- इतक्या किंमतीच्या खाद्य वस्तु स्वरूपात लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात. आला आहे.
तसेच संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत. यास अनुसरून प्रथम टप्प्यात थेट रोख स्वरुपात दयावयाच्या लाभाकरीता वित्त विभागाने संदर्भाधीन क्र.४ येथील नस्तीवर दर्शविलेल्या सहमतीस अनुसरुन संदर्भ क्र.३ येथील शासन ज्ञापनान्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध बचतीमधून रु.२३१.०० कोटी इतका
निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे. सदर थेट स्वरुपात द्यावयाच्या लाभाकरीताची रक्कम
रु.२३१.०० कोटी इतका निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. सदर निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर निधी
आहरण व संवितरण अधिकारी यांनी तातडीने आहरीत करुन पात्र लाभार्थ्यांच्या बँक/डाक खात्यात ऑनलाईन प्रणालीमार्फत प्रति कुटुंब रु.२०००/- इतका लाभ देण्याची कार्यवाही करावी.
३. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करतांना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तिय नियमांचे पालन करून वित्त विभागाच्या
संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे
कार्यवाही करण्यात यावी.
Brilliant
Idia
No comments
NO inkam
2000
So beautiful
Hii
So nice
sachinuikey339@gmail.com
2000