ladki bahini yojana rules : विषय:- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे
की,
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओदावरे वेगळी माहिती प्रसारित करण्यात
येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळया स्तरावरुन या
कार्यालयाकडे विचारणा होत आहे.

या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये
तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ladki bahini yojana rules : योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास
प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात
कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची
सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी.