पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेचा छोट्या व्यवसायिकांनी लाभ घ्यावा.
Loan will be available from Central Govt
कोविडच्या बिकट परिस्थितीत छोट्या व्यवसायिकांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘आत्मनिर्भर भारत’ योजने अंतर्गत सदरील योजना सुरू करण्यात आली होती. या माध्यमातून फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, न्हावी, धोबी, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना याचा उपयुक्त लाभ होतो.
अधिक माहितीसाठी
इथे क्लिक करा
पहिल्या टप्प्यात विनातारण अत्यल्प व्याज दराने १०,००० पर्यंत कर्ज दिले जाते. केवळ अर्जदार कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा एवढीच अट आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गरजू व्यवसायिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नाममात्र कागदपत्रांची आवश्यकता असलेल्या या योजनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
• योजनेची वैशिष्टे
– विनातारण १०,००० रुपयांपर्यंत खेळते भांडवल
– वेळेत परतफेड करणाऱ्यांचे ७% व्याज सरकार देणार आहे.
– वेळेत कर्ज फेडणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात २०,००० रुपये तर तिसऱ्या टप्प्यात ५०,००० रुपये कर्ज
Loan will be available from Central Govt
• आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड/ मतदान कार्ड
– पॅन कार्ड
– बँक पासबुक
– आधार लिंक मोबाइल क्रमांक
गरजू व्यावसायिक बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काही आवश्यकता भासल्यास निश्चित मदत करण्यात येईल.