आता यांना मिळणार 1500 रुपये

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोविड-१९ च्या संसर्गाची साखळीतोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

त्याअंतर्गत राज्यातील फेरीवाले वपथविक्रेते यांच्या व्यवसायावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे फेरीवाले व पथविक्रेते यादुर्बल घटकांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर बाब लक्षात घेता मा. मुख्यमंत्री महोदययांनी दि. १३/०४/२०२१ रोजी दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहीर केलेले आहे.याअंतर्गत राज्यातील सर्व अधिकृत पथविक्रेत्यांना रु. १५००/- ची अर्थिक मदत देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे.

ही पण बातमी वाचा ड्रायव्हिंग लायसन्स घर बसल्या बनणार RTO ऑफिस मध्ये जायची गरज नाही

यानुसार राज्यातील फेरीवाले व पथविक्रेत्याना रु. १५००/- ची अर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विराधीन होती.

शासन निर्णय:-
कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निबंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अधीकृत पथविक्रेत्यांना रु. १५००/- ची सहाय्यता रक्कम देण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

०२. कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निबंधाच्या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले व पथविक्रेते यांना प्रत्येकी रु.१५००/-याप्रमाणे अर्थिक मदत देण्यासाठी रु.६१.७५ कोटी (रुपये एककसष्ट कोटी पंचाहत्तर लाख फक्त) इतका निधी सह आयुक्त तथा सह संचालक,नगरपरिषद
प्रशासन संचालनालय यांच्याकडे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

०३. उपरोक्त अर्थिक सहाय्यतेसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या
योजनेत अर्ज केलेल्या फेरीवाले व पथविक्रेत्यांना ग्राह्य धरले जाईल.

०४. राज्यातील PM-SVANIDHI मध्ये दि. १५/०४/२०२१ पर्यंत एकुण ४११७४५ पथविक्रेत्यांनी अर्ज केलेले आहेत. सदर लाभाचे पॅकेज दि १५/०४/२०२१ पर्यंत PM-SVANIDHI मध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांना लागू करण्यात येईल.

०५. सदर निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी सह आयुक्त तथा सह संचालक, नगरपरिषद
प्रशासन संचालनालय यांना नियंत्रक अधिकारी तसेच संबंधित सहाय्यक संचालक, नगरपरिषद
प्रशासन संचालनालय, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
०६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *