आदेश :-
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यांतर्गत कोरोना विषाणुचा (कोव्हिङ – 19 ) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असुन
महाराष्ट्र शासन , आरोग्य विभागाव्दारे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता साथरोग प्रतिबंध कायदा , 1897 लागु करून त्यातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे व त्याकरिता अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आल्या आहेत.
आणि ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे.
तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गीत
आहे असे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड – 19 ) चा प्रादुर्भाव 2/13 राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13/02/2020 पासुन लागु करुन खंड 2, 5 तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.
त्याशिवाय भारत सरकार, आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केलेप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात लोकांनी येवु नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक होत असल्याची माझी खात्री झालेली आहे.
त्याकरिता तात्काळ प्रतिबंध उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुर्दीच्या अनुषंगाने जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे.
ज्याअर्थी वरील संदर्भ क्र. 07 अन्वये ब्रेक द चेन बाबतचे आदेश राज्य शासनाव्दारे निर्गमित करुन या कार्यालयांस प्राप्त झालेले आहेत. त्याअर्थी मी संदीप कदम, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ( 1974 चे 2 ) चे कलम 144 नुसार मला प्राप्त अधिकारान्वये असे आदेश जाहीर करतो की, जिल्हयात मोठया प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमवु न देता व कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी संपुर्ण भंडारा जिल्हयामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मीक, क्रिडा विषयक प्रदर्शने व शिबीरे, सभा, मेळावे, जत्रा. यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, इत्यादी कार्यक्रमास/उपक्रमास
मनाई करण्यात येत आहे.
तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तसेच संबधीत विभागाकडून मोठया प्रमाणात लोक एकत्र येतील अश्या कोणत्याही कार्यास/कार्यक्रमांस परवानगी देण्यात येऊ नये तसेच संदर्भ क्र. 06 व 07 यामधील सुचनांना समायोजित करुन खालील सुचनांसह सदरचा आदेश लागु करीत आहे.
ही पण बातमी वाचा 1000/1500/2000 रु बँक खात्यात जमा होणार
1. कलम १४४ व रात्रीची संचारबंदी लागू करणे-
अ. जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू करण्यात येत आहे.
आ. कोणत्याही व्यक्तिस वैध कारणाव्यतिरीक्त किंवा सदर आदेशात नमुद अत्यावश्यक सेवेच्या कामाव्यतिरीक्त सार्वजनिकरीत्या बाहेर निघण्यास/फिरण्यास पुर्णत: मज्जाव करण्यात येत आहे.
इ. सदर आदेशात नमुद सेवा वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक स्थळे, सेवा इ. पुर्णत: बंद राहतील.
ई. वैद्यकिय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना सदर वरील आदेशातून सुट असुन त्यांचे कामे आवश्यकतेनुसार सुरु ठेवण्यात येतील.
2. अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील सेवांचा समावेश असेल:-
अ. रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, औषध निर्माण कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा. आ. पशु वैद्यकिय दवाखाने, पशुवैद्यकिय सेवा, पशु संवर्धन केंद्र, पशुखाद्य दुकाने/सेवा
इ. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कंफेक्शनरी, सर्व प्रकारची
अन्नधान्य व खाद्य दुकाने जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांचे विक्री ई. शितगृहे व वखारी संबंधित सेवा
उ. सार्वजनिक परिवहन- रेल्वेगाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस.
ऊ, विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या सेवा.
ऋ. स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व कामे.
ल. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा.
ऐ. भारतीय रिझर्व बँकेने घोषीत केलेल्या अत्यावश्यक सेवा
ऐ. मालवाहतूक.