एक एप्रिलपासून वीजदर होणार कमी

एक एप्रिलपासून वीजदर दोन टक्क्यांनी होणार कमी
वीज आयोगाचे कंपन्यांना निर्देश

मुंबई :  वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून वीजदर सुमारे २ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण झालेल्या सामान्य ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

वीज नियामक आयोगाने सुनावणीदरम्यान ‘एफएसी’ (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.

ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगांसाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले. तर यावर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीजदर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही पण बातमी वाचा ग्रापंचयतची संपूर्ण पोलखल हा अर्ज करा

दृष्टिक्षेपात दरकपात महावितरण :

रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्का, तर बिगर रहिवासीसाठी कंपनी,
उद्योगांना २.५ टक्के. वेस्ट: रहिवासी इमारतीसाठी एप्रिलपासून ०.१ टक्का, तर विगर रहिवासी, कंपनी, उद्योग यांना ०.३ ते २.२ टक्के. -अदानी : रहिवासी इमारतीसाठी एप्रिलपासून ०.३ टक्का, तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योग यांना १.४ ते १.६ टक्का,

-टाटा : रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून ४.३ टक्के, तर
बिगर रहिवासी, कंपनी, उद्योगांना १.१ ते ५.८ टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *