राशन कार्ड यादी मोबाईल वर पहा

तुम्हाला तुमच्या गावातील राशन कार्ड यादी मोबाईल वर पहायची व त्याचबरोबर धान्य वाटप यादी मोबाईलवर कशी पाहायची हि माहिती आपण या लेखा मध्ये सांगणार आहे?

तुमच्या जवळ रेशन कार्ड आहे का ? रेशन कार्ड असल्यास आपले नांव रेशन कार्ड मध्ये नोंद आहे का ? रेशनकार्ड चे खूप अनेक प्रकार आहेत पण आपल्याला आपल्या रेशन कार्डचा ऑनलाईन RC नंबर माहित नसेल त्याचबरोबर आपल्याला आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावातील सर्व लोकांचे RC नंबर तसेच कोणाला राशन किती मिळते याबद्दल माहिती आहे का.

ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

तुमच्या गावातील नागरिकांना रेशन मिळते तर कोणाकोणाला राशन मिळते आणि किती मिळते हे तुम्हाला माहित नसेल तर आपण घरबसल्या राशन मोबाईलवर चेक करू शकता. राशन दुकानदार आपल्याला आपले राशन बरोबर देतो का हे पाहता येणार आहे.

तुमच्या गावातील एकूण किती नागरिकांना मोफत राशन ( प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ) यामधून मिळते. त्याचबरोबर रेगुलर म्हणजे पैसे देऊन किती किलो राशन मिळते हे आपण मोबाईलवर पाहू शकतो.

राशन किती मिळते मोबाईल वर चेक करा

तुमच्या गावातील लोकांना किती राशन दिले जाते त्याचबरोबर राशन धान्य वाटप स यादी मोबाईलवर पाहण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदरखालील वेबसाईट वर जावे लागेल.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

http://feast.mahafood.gov.in/FrmFindRcDetails.aspx

त्यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चा कॉड दिसत असले तो तिथं भरावा लागेल आणि सबमिट. आणि नंतर
Know your Ration Entitlement असे पेज ओपन होईल.

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी 2021

सर्वात अगोदर Allocation Type मधून रेगुलर आणि PMGKY या ऑपशन पैकी आपल्याला एकाला क्लीक करा.
त्यानंतर महिना निवडा व वर्ष निवडा
त्यानंतर आपला जिल्हा, तालुका निवडा
सर्वात शेवटी आपण आपल्या गावचे नाव सिलेक्ट करा . गाव जर दिसत नसेल तर आपल्या गावातील ज्यांना धान्य वाटप दिले आहे त्या संस्था,बचत गटाचे नावावर क्लिक करा

अशा प्रकारे आपण तुमच्या गावातील धान्य वाटप यादी तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *