देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे अनेक Ration Card New Updat
कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. कोट्यवधी नागरिकांना
मोफत अन्नधान्य, तसेच रेशनही पुरविले जाते, परंतु असंख्य लोक या
योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्रतेच्या
निकषात बसत नसतानाही ही मंडळी रेशन कार्डवर मोफतचे रेशन लाटत
आहेत. यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिक यापासून वंचित राहू
शकतात. त्यामुळे सरकारने अशांविरोधात कठोर पावले उचलण्याचा
निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने नियम लागू केले आहेत
आहत नवनि कष?
स्वतःच्या कमाईतून विकत
घेतलेला १०० चौरस मीटरचा
प्लॉट / फ्लॅट / दुकान, चार
चाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र
परवाना असल्यास, तसेच
गावात कुटुंबाची वार्षिक
मिळकत दोन लाख किंवा
शहरात कुटुंबाची वार्षिक
मिळकत तीन लाख इतकी
असलेल्यांना आपले कार्ड
तहसीलला जमा करायचे आहे.
कोणती कारवाई होऊ शकते?
या नियमानुसार जर रेशन कार्ड जमा केले नाही, तर तपासणीनंतर
अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्या Ration Card New Updat
कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच
नाही, तर या परिवारांनी आतापर्यंत घेतलेले सर्व रेशन त्यांच्याकडून
वसूल करण्यात येणार आहे.