दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत
आहे.मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
हे पण वाचा जिल्हेवाईज यादी आली यांना मिळणारा घरकूल
तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
महानगरपालीका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करावी.
१.आयुक्त, महानगरपालीका
२.वार्ड ऑफीसर सदस्य
३. वैद्यकीय अधिकारी ,महानगरपालिका
४. शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक
अध्यक्ष सदस्य सदस्य नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामपंचायत स्तरावर यांच्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करावी.
१. जिल्हाधिकारी अध्यक्ष
२. मुख्याधिकारी, नगरपरिषद
सदस्य
३. वैद्यकीय अधिकारी ,नगरपरिषद/जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) सदस्य
७.१) समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त,महानगरपालिका/मुख्याधिकारी,
नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
(iii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा.जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका
वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
७.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टण्यात शाळेत बोलविण्यात यावे.उदा.वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी/सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
७.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
७.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी,नगरपरिषद यांनी
शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य,
स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना ( SOP )सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अव परिशिष्ट-ब मध्ये देण्यात येत आहेत.