यांचा वीजबिल माफी होणार / Vij Bill Mafi Yojana

Vij Bill Mafi Yojana राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी दिनांक ०२.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहिर केलेले आहे. सदर धोरणाचे हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एक उद्दिष्ट आहे.

सदर धोरणातील परिच्छेद क्र. ७.४ मध्ये हातमाग विणकरांच्या कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफ येईल असे नमूद केले आहे. सदर अनुषंगाने हातमाग विणकरांच्या कुटूंबाना प्रतिमाह २ मोफत वीज देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहने देण्याच्या अनुषंगाने हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.3

सर्व ग्रामपंचायत यादी

.सदर योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबातील हातमाग विणकरांची पात्रता :-(अ) लाभार्थी हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्यांच्याकडे तसे ओळखपत्र असावे.(ब) एकाच कुटुंबात जास्त लाभार्थी असतील तर फक्त एकच लाभार्थी सदर योजनेसाठी अर्ज करु शकेल.(क) अर्जाव्या दिनांकापूर्वी सहा महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा.विणकाम करत असल्याचा मागील ६ महिन्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदीचे बील / पक्का माल विक्रीचे नील/ महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यास सदर विणकरास विणकाम मजूरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.(ड) अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक.(इ) लाभार्थी हातमाग विणकर कुटुंबाचे नावे वीज जोडणी असावी.(ई) हातमाग विणकरांच्या कुटुंबाना दरमहा १ ते २०० युनिट पर्यंत (२०० युनिट) मोफतवीज शासनामार्फत देण्यात येईल त्यापेक्षा जास्त म्हणजे २०० युनिटच्या वर वापर झालेल्या बीलाची रक्कम स्वत: लाभार्थ्याला भरावी लागेल.(उ) विणकर कुटुंबाने वीज बील देयकाची रक्कम नियमीत भरणा करणे गरजेचे राहिल. विलंब बील भरणा आकारणीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही.(ऊ) सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकरांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावाघेण्यात येईल.

सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय सोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही.योजनेची अंमलबजावणी :(a) वरील पात्रता धारण करणारा व्यक्ती सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये संबंधीत प्रादेशिक उपायुक्त यांचेकडे अर्ज सादर करतील.Vij Bill Mafi Yojana(b)दरमहा प्राप्त झालेले अर्ज संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग व विणकर सेवा केंद्र यांचे कार्यालयातील तांत्रिक अधिकारी / कर्मचारी हे सदर अर्जदार विणकरव्यवसाय करीत असल्याची स्थळ तपासणी करतील.

बॅनर

संबंधित प्रादेशिक उपायुक्त ( वस्त्रोद्योग ) प्राप्त अर्जांची छाननी व तपासणी करुन आपल्या शिफारशींसह हातमागविणकरांची यादी आयुक्त (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांना मंजूरीसाठीसादर करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *