घरकूल योजने साठी निधी मंजूर / थेट बँक खात्यात

प्रस्तावना:-
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत शबरी आदिवासी घरकूल योजनेतून (home skim) अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना पक्के घरकूल बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

घरकूल योजना 2020 साठी निधी मंजूर

या योजनेंतर्गत दरवर्षी उद्दीष्ट निश्चित करण्यात येऊन त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.३ येथील नस्तीन्वये प्रस्तावित केल्यानुसार सन २०१९-२० या वर्षाअखेर प्रलंबित निधी सन २०२०-२१ या
वर्षातील अर्थसंकल्पित तरतूदीतून वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक टी-५ मधील २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण या मुख्य शीर्षाखालील शबरी आदिवासी घरकूल (home skim) योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाअखेर प्रलंबित निधी सन २०२०- २१ या वर्षातील अर्थसंकल्पित तरतूदीतून वित्त विभागाच्या अनुमतीने ५० % मर्यादेत खालीलप्रमाणे निधी
वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१ (रू.लाखात) योजनेचे नांव व लेखाशीर्ष सन २०२०-२१ करीता सदर शासन निर्णयान्वये वितरीत अर्थसंकल्पित तरतूद करण्यात येत असलेली तरतूद (०२)(३३) शबरी आदिवासी घरकूल योजना( home skim) (२२२५ २७५००.००१३७५०.०० डी २७१), ३१-सहाय्यक अनुदाने(वेतनेतर)

 

ही पण बातमी वाचा http://aamhishetkaree.com/?p=1994

पहा कोणाला मिळणार

२. वरीलप्रमाणे रू.१३७५०.०० लाख ( रूपये एकशे सदोतीस कोटी पन्नास लाख फक्त) इतका निधी यंत्रक अधिकारी म्हणुन आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना अर्थसंकल्पिय निधी वितर प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे

घरकूल यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी

त्यांनी सदर निधी योजनेचे अंमलबजावणी अधिकारी म्हणून
संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी तथा
उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण (BEAMS)
प्रणालीवर तात्काळ वितरीत करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *