रात्री झोपण्यापूर्वी १ वेळेस स्वामींचा हा मंत्र बोला सकाळी चमत्कार बघा/श्री स्वामी समर्थ

Spread the love

श्री स्वामी कृपातिर्थ तारक मंत्र

निःशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला

परलोकीही ना भिती तयाला ||२||

उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी, ही स्वामीशक्ती कळू दे । जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ||३||

खरा होई जागा श्रध्देसहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त ? आठव! कितीदा दिली त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||

विभूती नमननाम ध्यानांदी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात । हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती न सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे. जळत्या उदबतीची राख पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी, पाणी तीर्थ म्हणून प्यावे, तारकमंत्र दररोज सकाळी एकदा म्हणावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *