ई पीक यादी आली ( E Pik Pahani last date 2024 )

E Pik Pahani last date 2024 : मित्रानो नमस्कार खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर E 2024 पर्यंत स्वतःच्या पिकांची पाहणी करणे शक्य असेल. जर या मुदतीत वाढ झाली नाही तर 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावर ई-पीक पाहणी सुरू होईल.

ई-पीक पाहणी कशी करावी ?

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर करणे हे ई-पीक पाहणीचे स्वरूप आहे. यासाठी, तुम्हाला ई-पीक पाहणी एप डाउनलोड करावे लागेल. प्ले स्टोअरवर जाऊन E-Peek Pahani (DCS) शोधा आणि Install वर क्लिक करा.

E Pik Pahani last date 2024

ई-पीक पाहणीचे फायदे

1) MSP मिळवण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा शेतमाल विकताना या डेटाचा उपयोग होऊ शकतो.
2) पीक कर्जाच्या पडताळणीसाठी तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतले आहे, तेच पिक नोंदवले आहे का, हे तपासण्यासाठी बँका या डेटाचा वापर करतात.
3) पीक विमा योजनेचा लाभ पीक विमा अर्ज करताना ई-पीक पाहणीतील नोंदी अंतिम मानल्या जातात.
4) नुकसान भरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाईसाठी ही माहिती वापरली जाते.

ई-पीक पाहणीची अट कशासाठी रद्द ?

राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्णय घेतले आहे. प्रारंभिक अटींनुसार, या अनुदानासाठी फक्त ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचे ठरवले होते. पण मित्रांनो याला मोठा विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करून सात-बाऱ्यावरील नोंदींना मान्यता देण्याची घोषणा केली आहे.

E Pik Pahani last date 2024 : आता ई-पीक पाहणीची अट फक्त अनुदानासाठी रद्द करण्यात आली आहे, तर खरिप पिकांची नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावी लागणार आहे.

ABMarathi
ABMarathi
Articles: 103

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *