गाय म्हैस ( Gai mhais yojana 2024 )

Gai mhais yojana 2024 : प्रकल्पाचे कार्यक्षेत्र:- विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ हा विदर्भ व मराठवाड्यातील
सर्व म्हणजे १९ जिल्हयांमध्ये राबविण्यात येईल.
प्रकल्पाचा कालावधी :- विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ सन २०२४-२५ ते २०२६-२७
या तीन वर्षे कालावधीत राबविण्यात येईल.

कर्ज मिळणार शेतकऱ्यांना

प्रकल्पाची उद्दिष्टे:-
१. शेतकऱ्यांच्या दारात गायी-म्हशींमध्ये पारंपारिक पध्दतीच्या तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत
रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भृण प्रत्यारोपणांव्दारे दुधाळ जनावरांची
संख्या वाढविणे.
२. शेतकरी, पशुपालक यांना संतुलीत आहार सल्ला देणे, वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा
पुरवठा करून पशुंच्या आहार पद्धतीत सुधारणा करणे.
३. गावपातळीवर पशुआरोग्य सेवा पुरविणे.
४. उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप.
५. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची उन्नती करणे.
६. रोजगार निर्मिती.

Gai mhais yojana 2024

पदुम-३,
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात उपरोक्त विवरणपत्रात
दर्शविल्याप्रमाणे ०९ घटकांचा समावेश आहे. सदर घटकांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ,
अटी / शर्ती व योजना राबविण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे विहीत करण्यात येत आहे.
(9) उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे वाटप :- प्रकल्पात समावेश
असलेल्या विदर्भ व मराठवाडयातील १९ जिल्हयात ०३ वर्षाच्या कालावधीत १३,४०० दुधाळ गायी-
म्हशींचे वाटप करण्यात येईल.

(अ) अटी / शर्ती:-
(१) एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रती दिन किमान ८ ते १० लिटर दुध
उत्पादन क्षमता असलेली १ गाय / म्हशीचे वाटप करण्यात येईल.
(२) वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना Digital Track ng Cow Collar लावणे
आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील.
(३) वाटप केलेली गाय / म्हैस ३ वर्षांपर्यंत विकता येणार नाही.
(४) वाटप केलेली गाय / म्हैस प्रकल्प संचालक, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प
यांचे नावे तारण ठेवण्यात येईल.
(५) वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करतांना त्या जनावरांचा ३ वर्षांसाठी
विमा उतरविणे बंधनकारक राहिल.
(६) विमा उत्तरविलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे
अनिवार्य राहील. रोख प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही.

(ब) लाभार्थी निवडीचे निकष:-
(१) शेतकरी, पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी २ दुधाळ जनावरे असावीत.
(२) दुध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान ३ महिने खाजगी / सहकारी यांच्या दुध
संकलन केंद्रावर दुध विक्री करणे आवश्यक आहे.
(३) प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात तसेच मागील ३ वर्षात कोणत्याही शासकीय योजनेंतर्गत
ज्या शेतकरी, पशुपालक यांनी लाभ घेतला आहे, असे शेतकरी, पशुपालक दुसन्या
टप्यात सदर घटकाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत.
(४) कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील.
(५) एका गावात जास्तीत जास्त ५ लाभार्थी निवडीस पात्र राहतील.
(क) गाय / म्हशीची खरेदी व अनुदान वाटप:-
(१) दुधाळ जनावरे खरेदी करतांना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील
किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशींची खरेदी
करू शकतील.

Gai mhais yojana 2024 : (२) प्रती गाय / म्हशीची किंमत साधारणपणे रु. १.०० लक्ष इतकी गृहीत धरण्यात आली

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *