Soyabean Kapus Anudan Yojana : शेतकऱ्यांनो, २१ ला पडणार अनुदान !
शेतकऱ्यांना खरीप २०२३ मधील अर्थसहाय्यः ८५ टक्के शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड
सन २०२३ व्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून, येत्या २१ सप्टेंबर रोजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमातून डीबीटीचे बटन दाबल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची रक्कम पडणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातीलाई – पीक पाहणीवरीलनोदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक
शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन
प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बैंक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या (ॐ) माध्यमातून होणार आहे. त्यानुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार सबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणाऱ्या समती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरीत करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून कृषी
विभागामार्फत माहिती संकलित करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात आलेल्या संमतीपत्रातील माहिती कृषी विभागाच्या ईपीकपाहणी
पोर्टलवर अपलोड करण्याचे ८५ टक्के पूर्ण झाले आहे. ९५ टक्के शेतकचांची माहिती अपलोड करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यात चार लाख ६४ हजार ६२१ सोयाबीन पैर केलेले व आठ हजार
७९१ शेतकरी कापसाची लागवड केलेले शेतकरी आहेत. यापैकी सोयाबीन पेरा केलेल्या तीन लाख ६६
हजार ४३९ शेतकऱ्यांची संमती पत्र कृषी विभागाकडे १३ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत दाखल झाले होते. तसेच
कापूस लागवड केलेल्या ६४३३ शेतकन्यांचे संमती पत्रही दाखल झाले होते. सोयाबीन व कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या या आकडेवारीत १३ सप्टेंबर पासून आज पर्यंत आणखी भर पडून जवळपास ८५ टक्के
शेतकऱ्याची माहिती पीक पाहणीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव म्हणाले. १३ सप्टेंबर रोजी पर्यंत कृषी विभागाने एपिक पाहणी पोर्टलवरलातूर तालुक्यातून सोयाबीनचे ५० हजार ३२४ तर कापूस लागवड केलेले दोन शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली
Soyabean Kapus Anudan Yojana : औसा तालुक्यातून सोयाबीन शेतकरी ६१ हजार १३५ तर हापूस असलेले दोन, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ५६ हजार ५६७ तर कापसाचे दोन रेनापुर तालुक्यातील सोयाबीनचे ३२ हजार ३३६ तर कापसाचे तेरा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोयाबीनचे १७८९६
उदगीर तालुक्यातील सोयाबीनचे ३४ हजार ६८८ तर कापसाचे १५. जळकोट तालुक्यातील सोयाबीनचे
१५,१४७ तर कापसाचे ११५८, देवणी तालुक्यातील सोयाबीनचे १९७०० तर कापसाचा एक. अहमदपूर तालुक्यातील सोयाबीनचे ४१ हजार १९५ तर कापसाचे पाच हजार १३६ आणि चाकूर तालुक्यातील सोयाबीनचे शेतकरी ३५ हजार ८२० तर सोयाबीन लागवड केलेल्या २४ शेतकन्यांची माहिती कृषी विभागाने अपलोड केलेली आहे. सदर काम सुरूच असून जिल्ह्यातील ९५ टक्के
शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित पाच टक्के शेतकरी काही त्रुटीमुळे अपात्र ठरू शकतात, असे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले.