नमो शेतकरी 4 हफ्ता 2 हजार रुपये मिळणार ( Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana )

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana : सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य
शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली.

त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष,
प्रति शेतकरी रु.६०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.६०००/- इतक्या निधीची भर
घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये
मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व
राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी
एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली
आहे.

प्रस्तुत योजने अंतर्गत संदर्भ क्र. (३) अन्वये पहिला हप्ता ( माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा
करण्यासाठी रु.१७२० कोटी इतका निधी, संदर्भ क्र. ( ४ ) अन्वये दुसरा हप्ता ( माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर)
लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. १७९२ कोटी इतका निधी तसेच,

(माहे डिसेंबर ते मार्च) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.२००० कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण रु.५५१२
कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता संचालक (वि.प्र.). कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ
क्र.(६) येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीरा अनुरारून, रान २०२४-२५ मध्ये नगो शेतकरी गहारान्गान निधी
योजनेच्या लेखाशिर्षा अंतर्गत गंजूर तरतूदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत चौथा हप्ता (गाहे एप्रिल ते जुलै)
लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रु. २०४१.२५ कोटी व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी
रक्कम रु.२०.४१ कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रु. २०६१.६६ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता ( माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा
करण्यासाठी रु.२०४१.२५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी
रु.२०.४१ कोटी, असा एकूण रु. २०६१.६६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करिता मंजूर केलेल्या तरतूदीतून भागविण्यात

सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी संदर्भ क्र. (१) च्या शासन निर्णयात नमूद व
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय / परिपत्रकांमधील तरतूदीनुसार खर्च करण्याची
जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
४. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र
आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.


Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana : प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी व
सहाय्यक संचालक, लेखा-१, यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे.
पृष्ठ ४ पैकी २

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *