Atal Construction Gharkul Scheme : मंडळी नमस्कार आज आपण अटल बांधकाम कामगार योजना 2024 या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
मंडळी अटल बांधकाम कामगार योजना 2024 हे एक महत्त्वाचे पाऊल आहे ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी विविध सुविधा दिल्या जात आहेत. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तसेच इतर संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेचा प्रारंभ 7 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आला होता आणि त्याअंतर्गत अजूनही लोकांना घरे बांधून दिली जात आहेत.
या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा
- लाभार्थीने अटल बांधकाम कामगार योजना 2024 साठी आधी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याची नोंदणी सक्रिय असावी कारण नोंदणी नसल्यास किंवा ती सक्रिय नसल्यास लाभ मिळणार नाही.
- लाभार्थीच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर पक्के घर असू नये, तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही गृह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) सातबारा उतारा
4) बँक पासबुक
5) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
6) सक्षम प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र
Atal Construction Gharkul Scheme : मंडळी वरील कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकता. मंडळी ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. यामुळे कामगारांना स्थिर निवासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. चला तर मग पाठवा तुमच्या गावातील इतर मित्रांना.