Chief Minister Planner Recruitment : कार्यक्रमाची ठळक रुपरेषा:-
१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री
योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत
प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.
२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.

३) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
४) निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मध्ये मोठे बद्दल ( ladki bahin yojana new update )
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :-
१) वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
(२) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
३) संगणक ज्ञान आवश्यक.
४) उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
५) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
६) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे :-
१) विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधारकार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) हमीपत्र.(ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
५. मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया:-
१) उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या
बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल.
२) सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या
निकषानुसार करण्यात येईल.
३) ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र
उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे
पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त,
कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला
प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या
कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व
वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक
उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी
कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
४) जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती
संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील.
५) जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास
रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या
समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी
Chief Minister Planner Recruitment : १ / शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणात उमेदवारांना
योजनादूत म्हणून पाठवतील.
६) मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे
कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या
नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा
हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या
पृष्ठ ८ पैकी ३