Pension for construction workers
शासन निर्णय :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्य 2/9 निवृत्तीवेतन योजनच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात
आहे. त्यास अनुसरुन मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP) पुढीलप्रमाणे विहित करणेत येत आहे.
निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष :-
(अ) वयाची ६० वर्षे पुर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान १० वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील.
(ब) पती/पत्नी च्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि, पती/पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.

(क) केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ (Employees State Insurance Act, १९४८) व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतूदी कायदा, १९५२ ( The Employees
Provident Fund and Miscellaneous Provision Act, १९५२) अंतर्गत लाभ
प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत.
२. निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण / दर :-
(अ) मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या
कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.
(ब) मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण / दर
खालीलप्रमाणे राहील :-
अ.क्र. मंडळाकडे नोंदणीची
एकूण वर्षे
दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन
(रू.)
१
२
१० वर्ष
१५ वर्षे
५०% (रू. ६,०००/-)
७५% (रू. ९,०००/-)
३
२० वर्षे
१००% (रू.१२,०००/-)
Pension for construction workers : कामगार-७
(क) मंडळाकडे जमा होणा-या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेवून, सदर
योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तींमध्ये बदल
करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल.