मुख्यमंत्री लाडका योजना सुरू राज्य शासनाचा जीआर ( Chief Minister’s Ladka Yojana )

Chief Minister’s Ladka Yojana : राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय
यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा
अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे
लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित
ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील
आय. टी. आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत
राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे
उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर
अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” ही योजना दि.३ डिसेंबर, १९७४
पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ
अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक
होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता सदर
योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मुख्यमंत्री लाडका योजना अर्ज

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी
मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन
२०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Chief Minister’s Ladka Yojana


१. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि
मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार
इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार
इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे
उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे
उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

Chief Minister’s Ladka Yojana : या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक
सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची
नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती
नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव
प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक
सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता यांची राहील.
बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण
केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.
लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था,
शासकीय, निमशासकीय आस्थापना / महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी
कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक
असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने
नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी
सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना/ उद्योगामध्ये सध्याच्या
मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक
पृष

ABMarathi
ABMarathi
Articles: 136

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *