Chief Minister Vayashri Yojana : नमस्कार, मंडळी जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या यशस्वितेनंतर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ व ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबविण्यासाठी शनिवारी व रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत प्रत्येक तहसीलमधून किमान १५ हजार अर्ज जमा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील एकूण २ लाख पात्र अर्जदारांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने मिळविण्यासाठी ३ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक गावात दोन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासह आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग, महसूल विभाग, आणि नगरपालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. ते गावोगावी जाऊन मुख्यमंत्री वयोश्री योजना व ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’चे अर्ज भरून घेत आहेत.
Chief Minister Vayashri Yojana : योजनेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आणि तालुकास्तरीय प्रमुख प्रत्यक्ष भेटी देत आहेत. तसेच, जिल्हाधिकारी सालीमठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.