Maha E Seva Kendra Registration 2024 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर
यांचे कार्यालय, शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर, सोलापूर 413003
महसूल शाखा- सेतू संकलन
दूर. क्र. (0217) 2731020
MAHARASHTRA फॅक्स क्र. (0217 ) 2621120
Email ID: rdesolapur@gmail.com
Email ID: setubrsol.rfsol-mh@gov.in
दिनांक: 26.07.2024
सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा जाहिरनामा (माहे जूलै 2024)
माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि), मंत्रालय, मुंबई यांचेकडील
दि. 19 जानेवारी 2018 अन्वये CSC केंद्रधारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेबाबत निर्देश देण्यात
आलेले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील CSC केंद्रधारकांना व त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही
व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरू नसेल परंतू जो CSC SPV चे केंद्र मिळण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत
असेल अशा व्यक्तींना सुचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा, अर्जाचा विहित नमूना, अटी व शर्तीबाबतची
माहिती तसेच शहरी / ग्रामीण भागाकरीता 330 रिक्त ठिकाणांची यादी https://solapur.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी सदर संकेतस्थळावरून अर्जाचा विहित नमुना डाउनलोड
करून त्यावरील परिपूर्ण माहिती भरुन खालील नमूद तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज स्विकारण्याचा कालावधी
दि. 12.08.2024 ते दि. 30.08.2024 कार्यालयीन वेळेत
(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
आपले सरकार सेवा केंद्र प्रक्रियेबाबत प्रसिध्दी https://solapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करणेत आली आह
Maha E Seva Kendra Registration 2024 : उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता अर्ज सेतू संकलन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय,
शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्रांच्या
स्वसाक्षांकित प्रती दिनांक 30.08.2024 सायं 5.00 वाजेपर्यंत समक्ष सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा
विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही.
तथा